निसर्गाचा प्रकाशोत्सव: भंडारदरा काजवा महोत्सव आणि सांधण व्हॅली ट्रेक🌟(बॅच 02)
निसर्गाच्या कुशीत, चांदण्यांच्या सावलीत आणि लाखो काजव्यांच्या लखलखाटात हरवून जाण्यासाठी सज्ज व्हा! यंदाचा उन्हाळा खास बनवा सांधण व्हॅली आणि भंडारदरा येथील काजवा महोत्सवाच्या सफरीने.
प्रवास वेळापत्रक:
कालावधी: ०२ दिवस / ०१ रात्र
प्रस्थान: शनिवार, ३० मे – सकाळी ११:३० वाजता वाटनुकूलहीत बस व्यवस्था (Ac)
आगमन: रविवार, ३१ मे – सायंकाळी ०७:०० वाजता
सहलीचे मुख्य आकर्षण
काजवा महोत्सव (Fireflies Festival): रात्रीच्या अंधारात झाडांवर लखलखणाऱ्या लाखो नैसर्गिक दिव्यांचा (काजव्यांचा) अविस्मरणीय सोहळा.
सांधण व्हॅली ट्रेक (Sandhan Valley): आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी, जिथे सूर्याची किरणेही पोहोचायला धजावतात. लेक साईड कॅम्पिंग: भंडारदरा धरणाच्या निळ्याशार पाण्याकाठी निसर्गरम्य मुक्काम.
निसर्ग सौंदर्य: सह्याद्रीच्या उंच रांगा आणि भंडारदरा परिसरातील विलोभनीय दृश्ये.