हरिश्चंद्र गड नाईट ट्रेक काजवा मोहत्सव (बॅच 01)
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या *हरिश्चंद्रगड* किल्ल्याची मोहिनी आणि निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेला *काजवा महोत्सव* यांचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा! ‘क्लाउड फॉर्मेशन’ आणि रात्रीच्या काळोखात चमकणाऱ्या लाखो काजव्यांची साथ असलेली ही ट्रेक सहल तुमच्यासाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरेल.
नियोजन आणि वेळ :
23 आणि 24 मे 2026
वाटनुकूलहीत प्रवास व्यवस्था(AC)
कालावधी: २ दिवस आणि १ रात्र
प्स्थान: शनिवार, २३ मे | सकाळी 11:00 वाजता (थत्ते ग्राउंड येथून)
परत आगमन: रविवार, २४ मे | संध्याकाळी अंदाजे ७:०० वाजता (थत्ते ग्राउंड येथे)
सहलीचे खास आकर्षण
मान्सूनपूर्व काळात हरिश्चंद्रगडावर निर्माण होणारी *ढगांची स्थिती (Cloud Formation)* आणि कोकण कड्यावरून दिसणारे विलोभनीय दृश्य मनाला भुरळ घालते. रात्रीच्या वेळी जंगलात हजारोंच्या संख्येने चमकणारे काजवे जणू काही झाडांवर आकाशगंगाच उतरली आहे असा भास निर्माण करतात. निसर्गाचा हा जादुई प्रकाश सोहळा अनुभवणे हा एक विलक्षण अनुभव आहे.
ट्रेकची वैशिष्ट्ये
ऐतिहासिक वारसा: प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर गुहा आणि सप्ततीर्थ पुष्करणीला भेट.
निसर्ग सौंदर्य: सह्याद्रीच्या उंच शिखरांवरून दिसणारे नयनरम्य दृश्य आणि धुक्याची चादर.
काजवा महोत्सव: पावसाळ्याच्या तोंडावर जंगलात होणारा काजव्यांचा लखलखाट पाहण्याची सुवर्णसंधी.